पैठण तालुक्यातून ४४ उमेदवारांचे नामांकन पत्र दाखल

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी १६५अर्ज विक्री झाले आहेत. 

तर २० जानेवारी मंगळवारी रोजी जिल्हा परिषदसाठी २१ व पंचायत समितीच्या गणासाठी असे ४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणूक साठी मोठ्या प्रमाणात अर्जाची विक्री झाली असून जिल्हा परिषद साठी २१ अर्ज व पंचायत समितीसाठी २३ असे ४४ दाखल झाले असल्याची माहिती  निवडणूक छत्रपती संभाजीनगर निवडणूक निर्वाचन अधिकारी प्रवीण फुलारे यांनी दिली आहे. आज बुधवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.